कावळा आणि सापाची गोष्ट

मुलांसाठी ही एक उत्तम पंचतंत्र कथा आहे, "कावळा आणि सापाची गोष्ट". एके काळी, जंगलात असलेल्या मोठ्या वडाच्या झाडावर कावळ्यांचे एक कुटुंब खुप दिवसांपासुन आनंदाने राहत होते. मात्र, त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही.एक भयानक,लांबसडक, भला मोठा काळा साप त्या झाड़ा जवळ आला आणि त्याने झाडाखाली एका बिळ केले आणि तो त्या बिळात राहु लागला. एके दिवशी त्याची नजर त्या झाडावर राहणाऱ्या कावळ्याच्या कुटुंबांवर गेली आणि तो साप त्याच्यावर लक्ष ठेवु लागला. 


कावळा आणि सापाची गोष्ट


एके दिवशी दुपारच्या वेळी कावळ्यांनी अन्नाच्या शोधात घरटे सोडले तेव्हा दुष्ट साप त्या झाडावर चढला आणि त्याने घरट्यात असलेली कावळ्यांची अंडी गिळून टाकले.काहि वेळे नज़र कावळे परत आपल्या घरट्यात आले तेव्हा त्यांना काही अंडी अदृश्य पाहून आश्चर्य वाटले. असे अनेक वेळा घडले. आई कावळी स्वतःशीच म्हणाली, "उद्या मी इथेच राहीन आणि माझ्या अंड्यांची काळजी घेईन."मात्र, दुसऱ्या दिवशी साप पुन्हा कावळ्यांचा घरटया जवळ आला. आई कावळी त्याला म्हणाली, “शू शु! जा! माझे अंडीखाऊ नकोस सोड त्यांना!" पण त्या दृष्ट सापाने लक्ष दिले नाही आणि मौल्यवान अंडी गिळून टाकले. 


कावळा आणि सापाची गोष्ट


नर कावळा परत आला तेव्हा त्याला त्याची बायको रडताना दिसली. "काय झालं?" त्याने विचारले. आई कावळीने उत्तर दिले, “आपण आपले गोडघर सोडले पाहिजे. एक भयंकर साप आहे जो आपली अंडी खातो . आजही त्याने आपली सगळी अंडी खाल्ली.नर कावळा थोडा वेळ विचार करून म्हणाला, “ आपण आपले घर सोडू शकत नाही. त्याऐवजी आपण सापांलाच धड़ा शिकवला पाहिजे! चल कावळ्यांचा आजीकडे जाऊया, ती शहाणी आहे आणि ती आपल्याला चांगला सल्ला देईल."


कावळा आणि सापाची गोष्ट


आजी कावळी राहत असलेल्या जवळच्या झाडावर दोघे एकत्र गेले. त्यानीं आपली  घडलेली सगळी हकिगत त्या आजीला सांगितली आणि म्हणाले, " आजी कावळी, आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे!" आजी  थोडा वेळ विचार करून म्हणाली, "माझ्याकडे एक युक्ती आहे, पण मी सांगेन तसे तुम्ही केलेच पाहिजे." दोन्ही कावळे  तयार झाले.


कावळा आणि सापाची गोष्ट


आजी कावळी त्यांना म्हणाल्या, “रोज सकाळी राणी आणि तिची दासी आंघोळीसाठी जवळच्या नदीवर येतात. ते आपले दागिने नदीकाठी काही सेवकांच्या देखरेखी खाली ठेवतात. तर त्या दागिण्यातुन हार तुम्ही असे चोरा कि त्या सेवकांचे लक्ष तुमच्यावर राहिल आणि ते तुमचा पाठलाग करतील.


कावळा आणि सापाची गोष्ट


दुसऱ्या दिवशी सकाळी  कावळ्यानी आजीची योजना पूर्ण केली. त्याने हार चोरला आणि सापाच्या बिळात टाकला. त्या बिळातुन नोकरांनी हार घेण्याचा प्रयत्न केला असता साप अस्वस्थ होऊन बाहेर आला. तो भला मोठा साप पाहुण ते घाबरले आणि त्यांनी सापाला बेदम मारहाण केली आणि तो साप मरण पिल्ला. अशा प्रकारे, कावळ्याचे कुटुंब त्यांच्या दुष्ट शत्रूपासून मुक्त झाले आणि आनंदाने जगू लागले.


कावळा आणि सापाची गोष्ट


बोध :- बुद्धी, सांघिक कार्य आणि हुशारीमुळे संकटांवर मात करता येते आणि आपल्याला प्रिय असलेल्या गोष्टींचे रक्षण करता येते.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.